नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाल्याचे भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. परंतू थोड्याच वेळात तिवारींनी ते ट्वीट डिलीट केले आहे. त्यामुळे शहा कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम निर्माण झालाय.
अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. अमित शहा कोरोनामुक्त झाल्याचे भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. पण काही वेळातच मनोज तिवारींनी ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे शहा कोरोनामुक्त झाले किंवा नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.