अमळनेर शहरात पोलीस दलाचे पथसंचलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने अमळनेर शहरातून पथ संचलन करण्यात आले.

 

पोलीस दलाच्या वतीने म.रा.वि.वि.क. कार्यालय परिसरात मॉक ड्रिल तसेच दंगा काबू योजना  गांधलीपुरा चौकी-दगडी दरवाजा – सराफ पट्टा – जामा मशीद – कासाली डि पि – आखाडा मैदान – माळी वाडा – झामी चौकी पावेतो असा सवेदनशील व समिश्र वस्ती भागात रूट मार्च काढण्यात आला.

 

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळक, अमळनेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह अमळनेर पोस्टे कडील ५ अधिकारी ३२ अंमलदार, मारवड पोस्टेकडील शितलकुमार नाईक यांच्या सोबत ५ अंमलदार, पारोळा पोस्टे कडील १ अधिकारी ३ अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अमळनेर कडील १ अधिकारी ५ अंमलदार, ३ आरसीपी पथक व २५ होमगार्ड उपस्थित होते.

Protected Content