Home Cities अमळनेर अमळनेर शहरातून एकाची दुचाकी लांबविली

अमळनेर शहरातून एकाची दुचाकी लांबविली

0
26


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विघ्नहर्ता दवाखान्याजवळून एकाची २५ हजार हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात आणि चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण सुरतसिंग पाटील रा. ढेकू ता. अमळनेर हा तरुण आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भूषण पाटील हा त्याची दुचाकी (एमएच १९ डीएच ८१४३) घेऊन अमळनेर शहरातील विघ्नहर्ता दवाखान्यासमोर आले होते. त्यावेळी त्यांनी दुकानासमोर दवाखान्यासमोर त्यांची दुचाकी पार्किंगला लावली होती. काम आठवून दुपारी ४.३० वाजेच्या ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर सोमवारी १२ डिसेंबरची दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound