Home Cities अमळनेर अमळनेर शहरातील महाविद्यालयाच्या गेट समोर विवाहितेचा विनयभंग

अमळनेर शहरातील महाविद्यालयाच्या गेट समोर विवाहितेचा विनयभंग


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एन.टी. मुंदडा महाविद्यालयाच्या गेट समोर एका विवाहितेचा हात पकडून तिचा विनयभंग केला, तसेच तिला पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवारी ३ मार्च रोजी दुपारी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

 

अमळनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय विवाहिता ही ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयात कामानिमित्त आलेली होती. त्यावेळी तिचे पती देखील सोबत होते. दुपारी २ वेळेच्या सुमारास महिलाही पतीसोबत घरी जात असताना महाविद्यालयाच्या गेट समोर अनिरुद्ध उर्फ मोन्याअर्जुन चंडाले, चंद्रकांत राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले आणि अनिरुद्धचा भाऊ सर्व रा. अमळनेर यांनी विवाहितेचा रस्ता अडवून तिच्याशी छेडखानी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तसेच तिचे पती यांना देखील लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने पतीसह अमळनेर पोलीस ठाणे गाठले, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound