अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शिवशक्ती चौक जवळील, लक्ष्मी टॉकीज जवळ फारूक इमाम बागवान(अल्ताप बागवान यांचे नातेवाईक) यांचा घराला दि 12 मार्च ला रात्री 11:30 दरम्यान अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. या आगीत संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याने परीसातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरातील शिवशक्ती चौक जवळील रहिवासी फारूक इमाम बागवान हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असून बागवान यांच्या घराला दोन दिवसापूर्वी अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. बागवान परिवारात नुकतेच लहान भावाचे लग्न झाले होते. त्याचा लग्नाचे आलेले सर्व नवीन साहित्य घरातच होते. ते देखील या आगीत जळून खाक झाले आहे. परिवारातील सदस्य 6 महिन्या पासून वीजपुरवठा खंडित करण्यात आलेने बाहेरच झोपले असतांना अचानक घरातून धूर निघू लागल्याने लक्षात आले. आग लागल्याचे पाहून परिसरात एकच आरडा ओरड केल्यावर परिसरातील समाजबांधव व मुश्ताक बागवान, हरीश गुजर,दौला बागवान ,अनिस खाटीकधावून आले व आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आग वाढतच असल्याने त्यानी सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांना संपर्क केल्याने त्यांनी तात्काळ नगरपरिषदेचे अग्नीषमण विभाग बंब पाठवून अग्निशमन कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे व कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. आगीचे स्वरूप भयानक असल्याने 2 बंब लागले. आग विझवण्यासाठी तसेच परिवाराचा साहित्य पूर्ण खाक झाल्याने परिवार पूर्णतः निराधार झाला आहे. या आगग्रस्तांना शासना कडून मदत मिळण्यासाठी लक्ष लागून आहे. अजून पर्यत शासनाकडून कुठलेही शासकीय अधिकारी सदर ठिकाणी भेट वा पाहणी साठी आले नसल्याची माहिती आहे. या आगीत प्राथमिक माहिती नुसार सुमारे 3/4लाखाचे नुकसान झाले आहे.