अमळनेर बस कोसळली : प्रवाशांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर डेपोची बस नर्मदा नदीत कोळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर सोमवारी १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केले असून संबंधितांना दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची (एमएच ४० एन ९८४८) क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस रात्री कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहचले असून बस क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ती सर्व मदती करण्याच्या हेतून जिल्हाधिकारी व जिल्हाप्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघात ग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याला सुरूवात करण्यात आली आहे.

 

संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.

 

घटनास्थळी मदतीसाठी – 095558 99091

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष – 0257-2223180  /  0527-2217193

 

या दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content