अमळनेर नगरपरिषदेवर प्रशासकाच्या नियुक्तीने इच्छुकांचा हिरमोड

अमळनेर प्रतिनिधी | राज्यात ओबीसी आरक्षणचा विषय गाजत असताना याची अधिवेशनात दखल घेत आगामी मुदत संपलेल्या नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात येवून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार अमळनेर नगरपरिषदेवर देखील प्रशासकाची नियुक्ती झाल्याने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केलेल्या उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

 

राज्यात विविध महानगरपालिका तसेच नगरपालिका यांच्यावर थेट प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे. यात जळगाव जिह्यातील १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथील नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून येथील प्रांताधिकारी सिमा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. २९ डिसेंबरपासून संबंधित पदाधिकारीची मुदत संपुष्टात आली होती. त्यामुळेच अमळनेर नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार म्हणून अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून सक्रिय होणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

Protected Content