Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग

अमळनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुरूवार २६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारे ४५ वर्षीय महिला पायी जात असताना गावात राहणारा हेमंत प्रकाश पवार याने महिलेचा रस्ता अडविला. त्यानंतर तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे असे सांगितले. याला नकार दिल्याने हेमंत पवार यांनी महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. या संदर्भात महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हेमंत पवार यांच्या विरोधात गुरुवार २६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound