अमळनेर, प्रतिनिधी । प्रा. अशोक पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा नुकताच पारितोषिक वितरण समारंभ लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी संविधांनप्रेमी, समाजाभिमुख, संवेदनशील नागरिक होणे हिच खरी राष्ट्रभक्ती होय असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई पाटील यांनी केले. त्या प्रा. अशोक पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेच्या ल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या. कोविड काळात अनेक उपक्रम बंद होते. या पार्श्वभूमीवर प्रा.अशोक पवार यांनी जन्मदिवसाचे निमित्त साधून केलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संभारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी प्रा.अशोक पवार यांनी समाजविघातक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारे अभ्यासू व स्वावलंबी तरुण घडविणे हे ध्येय असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे सेवा निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच. टी. माळी, जि प सदस्या सौ जयश्री पाटील, जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमा पाटील, संदिप घोरपडे आदिंनी मार्गदर्शन करून प्रा अशोक पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या सामाजिक कार्याची कौतुक केले. प्रस्ताविक बन्सीलाल भागवत यांनी केले. प्रा अशोक पवार व सौ मीनाक्षी पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले. आभार प्रा लिलाधर पाटील यांनी मानले.
यावेळी अर्बन बँक संचालक प्रविण जैन,मा.नगरसेवक राजू फाफोरेकर,खा शि मंडळ संचालक हरी भिका वाणी, धनगर समाज मंडळ चे नितीन निळे,समाधान कंखरे, धनगर सर , पन्नालाल मावळे,जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लहान गटातील प्रथम पारितोषिक विजेते योगेश रविंद्र पाटील, तन्मय नितीन पाटिल,दर्शना नरेंद्र चौधरी, द्वितीय तनुजा प्रकाश नेरकर,तृतीय चंद्रकांत धर्मेंद्र माळी, मयूर संजय चौधरी,ललित गजानन सैंदाने तर मोठा गटात प्रथम योगेश रतनसिंग राठोड, द्वितीय भुषण रतनसिंग राठोड,धर्मेंद्र ईश्वरलाल देशमुख, तृतीय घनश्याम सुखदेव नेरकर,चतुर्थ अशोक रघुनाथ राठोड यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी वाल्मिक मराठे, छाया इसे, हमीद जनाब, सत्तार मास्टर, सोनवणे, पवार आप्पा, डॉ राहुल निकम, विठ्ठल पाटील, संदिप जैन, गौतम मोरे, डी. एम. पाटील, यतीन पवार, कैलास पाटील, राज पाटील, बाळू बिऱ्हाडे, सुनिल धनगर, एस. एम. पाटील, आशिष पवार, बापूराव पाटील, कुलकर्णी सर, आनंद कोळी आदिंनी परिश्रम घेतले.
स्पर्धेत या शाळांनी नोंदविला सहभाग
या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील प्रताप महाविद्यालय, धनदाई महाविद्यालय, जय योगेश्वर हायस्कूल व ज्यू कॉलेज, नवभारत विद्यालय व ज्यू कॉलेज दहिवद, एन. टी. मुंदडा ज्यू. कॉलेज, सानेगुरुजी विद्यालय,जी .एस. हायस्कूल, डी. आर. कन्या हायस्कूल, व्ही. झेड. हायस्कूल शिरूड, अमळगाव हायस्कूल,आदी संस्थांच्या ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.