अमळनेर प्रतिनिधी । दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर अज्ञात 8 ते 10 तरुणांनी दगडफेक केल्याने जेसीबीचा काच फुटला असून पोलिसांची गाडी येताच तरुणांनी पळ काढला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात गेल्यानन्तर नगरपरिषदेने कालपासून त्याचे बुरुज पाडणे सुरू केले होते आज 25 रोजी सर्व काम आटोपल्यानन्तर जेसीबी मशीन दगडी दरवाज्याजवळ उभे असताना 8 ते 10 जणांचा जमाव आला आणि अचानक दगडफेक सुरू केली तेव्हड्यात तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले ताबडतोब पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहा पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर , पोलीस नाईक शरद पाटील तेथे पोहचल्याने तरुणांनी पळ काढला. घटनेबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक विशिष्ट समाजाच्या तरुणांनी ही दगडफेक केली असल्याची चर्चा होती रात्रीच पोलिसांनी परिसरातील सी सी ती व्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते.