अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे अमळनेर शहरातील शाळांमध्ये प्रतिमा पूजन व पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कुल, अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल तसेच न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कुल मधील बालगोपाल तसेच विद्यार्थी विद्यर्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातून विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा व दिंडी निघाली होती. अनेक बालगोपाल यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी, वारकरीच्या वेश परिधान करून संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. पी. बी. ए. इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षिका व विध्यार्थीनीनी नववारी साडी परिधान करून फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. सचिन भाऊ खंडारे मित्रपरिवारा कडून चॉकलेट व बिस्किटे वाटप करण्यात आली.
तर दुसरीकडे अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये याच पद्धतीने काहीसे नियोजन केले गेले होते. शेकडो वर्षापासून विविध जाती धर्मातील लोकांना वारकरी नावाच्या एका माळेत गुंफून विविध संतांच्या प्रबोधनाने, साहित्याने पावन झालेल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री विठ्ठल पांडुरंगास अभिवादन करण्यासाठी व आजच्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि संतांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आषाढी एकादशी निमित्ताने भजन ,अभंग गायन ,पालखी मिरवणूक आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणी सारखी वेशभूषा साकारलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल नामात सर्व दंग झालेले विद्यार्थी तुळस डोक्यावर धरून, नऊवारी साडी नेसलेल्या लहान विद्यार्थिनी, वारकरी वेशभूषाचे पांढरे कपडे परिधान करून गळ्यात टाळ आणि विणा धारण करून चिमुकले विठू नामाचा गजर करत होते. यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी यांनी पालखीचे पूजन केले. शाळेतील शिक्षिका सुरेखा सोनगडकर, जयश्री भोसले, मंगला चौधरी, वर्षा चुंबळकर, चारुशीला पाटील, रुचिता पाटील,अश्विनी चौधरी, देवयानी पाटील, सुरेखा सैंदाणे, जोत्स्ना भोसले, नयनतारा सैंदाणे, मुस्कान ढिगराई व इतर शिक्षक उपस्थित होते.