अमळनेर, प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील गजानन महाराज मंदिर परिसरात तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अमळनेरच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सचिन भाऊ मित्र परिवार, सुदर्शन मित्र मंडळ, नागेश्वर मंदिर परिसर, जय अंबे मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र मंडळ, हुतात्मा रमेश बोरसे चौक, कन्हैया मित्र मंडळ, भगवा चौक, साईबाबा मित्र मंडळ (वाघ बिल्डींग), बालाजीपुरा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी आमदार स्मिता वाघ तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांनीही आवर्जून उपस्थिती दिली.