जळगाव प्रतिनिधी । अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे हे कामानिमित्त सुटी घेवून खासगी वाहनाने नाशिककडे जात असतांना चांदवडपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडाळीभोई गावालतगत खोल दरीत कार कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.
अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे हे खासगी कामानिमित्त दोन दिवसांची सुट्टी घेवून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिककडे खासगी वाहनाने निघाले. नाशिक शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडाळीभोई गावाजवळील १५० फुट खोल दरीत व्हॅगनर कार कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शहा यांनी अपघात झाल्याची माहिती कळविली आहे. आपघात झाल्याचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर चांदवड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून ससाणे यांचा मृतदेह बाहेर काढला.