Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांना बदनाम करण्याचा डाव ; अ‍ॅड. रवींद्र पाटील (व्हिडिओ )

अभिषेक पाटील यांना बदनाम करण्याचा डाव ; अ‍ॅड. रवींद्र पाटील (व्हिडिओ )

0
32


 

जळगाव, प्रतिनिधी ।  अभिषेक पाटील हे अनेक घोटाळ्यांवर आवाज उठवत असून याचमुळे त्यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आल्याचा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, माजी नागसेविका लता मोरे आदी उपस्थित होते. अभिषेक पाटील हे अनेक घोटाळ्यांवर आवाज उठवत असून याचमुळे त्यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आल्याचा  आरोप करण्यात आला.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा कट नुकताच उघडकीस आला आहे. या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जिल्हा पेठ पोलिसांकडे करण्यात आली आहे. यावेळी महिला पधिकाऱ्यांनी अभिषेक पाटील यांना बदनाम करण्यात येत असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/383605239476861

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2431407337161907


Protected Content

Play sound