अभिनेत्री दीपाली सैयदचे ‘पाक कनेक्शन’ : माजी पीएचा आरोप

नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेत्री दीपाली सैयद यांचे पाकिस्तानशी संबंध असून त्यांनी तेथील नागरिकत्व देखील घेतलेले असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या माजी पीएने आज केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

दीपाली सैयद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप लावले. अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दिपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते आहे. यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी आज केला आहे. या संदर्भातील पुरावे देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केले.

 

 

दरम्यान, भाऊसाहेब शिंदे यांनी दिग्गज नेत्यांवर देखील टिका केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दिपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप केला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Protected Content