जळगाव : प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम आज अभाविप कार्यालय, नवी पेठ, जळगाव येथे झाला.
व्यासपीठावर महानगर अध्यक्ष डॉ.भूषण राजपूत, महानगर मंत्री रितेश चौधरी व प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे उपस्थित होते. मागील शैक्षणिक वर्षातील अभाविप कार्याला उजाळा महानगरमंत्री रितेश चौधरी यांनी दिला सिद्धेश्वर लटपटे यांनी मागील शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी विसर्जित करून नवीन शैक्षणिक वर्ष कार्यकारिणी जाहीर केली
या कार्यकारिणीत महानगर अध्यक्ष – प्रा.भूषण राजपूत , महानगर उपाध्यक्ष – प्रा.गौरव खोडपे , महानगर मंत्री – आदेश पाटील , सह मंत्री – सोहम पाटील , सहमंत्री – कल्पेश पाटील , TSVK प्रमुख – प्रज्वल पाटील , विद्यार्थीनी प्रमुख – हर्षलता पाटील , कार्यालय मंत्री – दीपक धनगर , सोशल मीडिया प्रमुख – ऋतिक माहुरकर , स्टुडंट्स फॉर सेवा कार्यप्रमुख – दीपक पाटील , कार्यकारिणी सदस्य – हिमानी महाजन, प्रतिमा याज्ञीक, प्रा.मनीष जोशी, प्रा.सुनील कुलकर्णी, रितेश महाजन, रितेश चौधरी, आदित्य नायर, आनंद चव्हाण, पवन भोई, हर्षल तांबट, ज्ञानेश्वर उद्देवाल, सिद्धेश्वर लटपटे यांचा समावेश आहे .
यानंतर महानगर मंत्री आदेश पाटील यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्याचें अभिनंदन केले .