भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळ तर्फे, भुसावळ येथील नाहटा चौफुली येथील शहिद स्मारक येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन कऱण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक विष्णु दादा बुगले, प्रमुख अतिथी म्हणून ॲड. बोधराज दादा चौधरी व शिवछत्रपती गोरक्षा अभियान जळगाव जिल्हा संयोजक रोहीत महाले उपस्थित होते.
या वेळी अभाविप शहर सहमंत्री वैष्णवी ताई कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्या वेळी त्यांनी सांगितले की आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे, विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताच्या कार्यासाठी पुढाकार घ्यावा. या वेळी अभाविप भुसावळ जिल्हा संयोजक अजय सपकाळ, छात्रशक्ती प्रमुख अथर्व जंगले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अभाविपतर्फे प्रजासत्ताक दिनी भारत मातेचे पूजन
1 year ago
No Comments