अपार्टमेंटमधून मध्यरात्री वृध्दाची मोटारसायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेहरू चौक येथील रत्ना अपार्टमेंटच्या पार्किंग झोन मधून मध्यरात्री वृध्दाची २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र श्रीधर भडगावकर (वय-६७) रा. रत्ना अपार्टमेंट, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे आहे. ते सराफाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग झोन मध्ये त्यांची मोटरसायकल (एमएच १९ एम ५८९०) ही पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली २० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरून नेली. बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मोटरसायकल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. रवींद्र भडगावकर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.

Protected Content