Home क्राईम अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला

अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील पार्वती नगरातील एका अपार्टमेंटमधील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी ५ पाच वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्नेहल सौरभ फडके (वय-३८, रा. पार्वती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या खाजगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे चांदीचे दागिने, चांदीचे ताट, समई, निरंजनी, चांदीचे शिक्के, कॅमेरा आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले. त्यानंतर स्नेहल फडके या १७ मे रोजी दुपारी २ वाजता घरी आल्या. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञान चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.


Protected Content

Play sound