जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघतात जखमी झालेल्या चिंचोली गावातील ६५ वर्षीय वृध्दाचा बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक आनंदा घुगे (वय-६५) रा. चिंचोली ता. जि.जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, अशोक आनंदा घुगे (वय-६५) रा. चिंचोली ता. जि.जळगाव हे आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. ते ग्रामपंचायत कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई कर्मचारी होते. मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी अशोक घुगे हे जळगाव शहरात कामानिमित्ताने मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी दुचाकी (एमएच १९ बीडी ३१६०) ने आले होते. काम आटोपून ते जळगावहून चिंचोली येथे जाण्यासाठी निघाले असता रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळ भरधाव येणाऱ्या दुचारी दुचाकी (एमएच १९ डीटी ६४४१)ने घुगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होती. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अशोक घुंगे यांच्या मृत्यू प्रकरणी दुचाकीधारक मुकुल किसन पाटील रा.कुसुंबा ता.जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.