चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्कूटीवरून घरी जात असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगिता नथ्थू पाटील (वय-५८) रा. वाकडी ता.चाळीसगाव असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील रहिवाशी संगिता पाटील ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. संगिता पाटील या आपल्या नातेवाईकांसोबत स्कुटीने प्रवास करत असतांना अपघात झाला.त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्या.त्यांना चाळीसगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी २५ एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संदीप माने करीत आहे.