जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात रविवारी रात्री झालेल्या आपघाता जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज मंगळवरी मृत्यू झाला आहे. मयत तरुणाच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान नातेवाईकांनी एकच आक्रोष केला होता.
याबाबत माहिती अशी की, महेश नारायण राठोड (वय २०, शहरातील पिंप्राळा हुडको) असे मयत तरुणाचे नाव असून तो टेन्ट हाऊसवर कामाला होता. दरम्यान रविवार २ रोजी रात्री तो दुचाकीने सिंधी कॉलनी परिसरातून जात असतांना एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला धडक दिल्याने महेश हा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येवून येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नातेवायिकांनी त्याला गोदावरी हॉस्पीटल येथे पुढील उपचाराथ दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालावली. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येवून येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान नातेवाईकांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. मयत महेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.