पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील बसस्थानकाजवळ दुचाकी अपघातात ज्येष्ठ व्यक्ती जखमी झाले होते. त्याचवेळी खासदार उन्मेश पाटील हे रस्त्याने जात असतांना अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावले. त्यांना तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील बसस्थानकाजवळ एक ज्येष्ठ नागरीक दुचाकी अपघात झाल्याने रस्त्यावर पडले होते. त्याच वेळी खासदार उन्मेश पाटील हे चाळीसगाव येथून पाचोरामार्गे जळगाव येथे लग्नाला जात होते. अपघात झाल्याचे खासदार पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची विचारपूस केली. गंभीर गखमी झाल्याचे पाहून त्यांना खासगी वाहनाने पाचोरा येथे उपचारासाठी रवाना केले.