मनीला, वृत्तसंस्था । अमेरिकेने नव्या ट्रेनचा सामनाकरण्यासाठी लस द्यावी अन्यथा व्हिजिटींग फोर्सेस अॅग्रीमेंट रद्द करणार असल्याचे फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती दुतेर्ते यांनी म्हटले की, अमेरिकेसोबतचा सैन्य करार रद्द होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा करार मोडीत निघाल्यास अमेरिकन सैन्याला फिलीपाइन्स सोडून जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीदेखील याच वर्षी दुतेर्ते यांनी अमेरिकेसोबतचा सैन्य करार रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या आदेशात बदल करून करार सहा महिन्यांसाठी निलंबित केला होता. अमेरिका आणि फिलीपाइन्समधील सैन्य करारानुसार, अमेरिकन लष्करी जवान फिलीपाइन्समध्ये युद्ध सराव करू शकतात.