जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानसिंग मार्केट परिसरातील हॉटेल विसावा च्या मागील बाजूस मंगळवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जळगाव शहरातील मानसिंग मार्केट जवळ असलेल्या हॉटेल विसावाच्या मागील बाजूस एक व्यक्ती बेशुध्दाअवस्थेत पडला असल्याची माहिती मंगळवारी शहर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र सोनार यांनी संबंधितांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ झीशान खान यांच्या खबरीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .मयताचे वय अंदाजे ४५ वर्ष असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले असून संबंधित वर्णनाच्या व्यक्तीबद्दल काही एक माहिती मिळाल्यास शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन शहर पेालिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र सोनार हे करीत आहेत.