जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील आर्या हॉटेल समोर सोमवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता अनोळखी ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्याला गावातील नागरिकांनी खाजगी वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मसावद गावाजवळ असलेल्या आर्या हॉटेल येथे सोमवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता सुमारास ५० वर्षीय अनोळखी प्रौढ हा एका रोडच्या बाजूला अत्यवस्था अवस्थेत मिळून आला. दरम्यान ही बाब मासावत गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खाजगी वाहनाने प्रौढ व्यक्तीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही