जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त होत असलेले शाखा अभियंता हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीत ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करत फिरतात अशा गरजू मुलांना चपलां व बुटांचे वाटप केले. साधारण तीस मुलांना याचा लाभ झाला.
आजच्या या युगात लोक शासकीय सेवेत असल्यामुळे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर लाखो रूपये खर्च करतात. पण, आज ता. ३१ मे रोजी ३७ वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या वायफळ खर्चाला फाटा देत गरीब व गरजू मुलांना चपलां व बुट भेट देऊन हा उपक्रम साजरा केला आहे.
काही दिवसापूर्वी हिरामण चव्हाण यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायाने फिरतांना पाहिले. त्याचवेळी त्यांनी या गरिबांना मदतीचा हात देण्याचा निश्यय केला व त्यानुसार आज आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांनी या गरजू मुलाना चप्पल, बुटांचे वाटप केले. चपला भेटल्यावर मुलांच्या चेहेऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून मोठ्याप्रमाणात कौतुक होत असून श्री. चव्हाण यांनीदेखील भविष्यात होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना असा सामाजिक उपक्रम साजरा करण्याचे आवाहन केले आहे.