मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज निर्गमित करण्यात आला.यामुळे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर शिक्षण विभागाने या फेरपरीक्षा लेखी स्वरुपात न घेता तोंडी परीक्षा घेत या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी देण्याबाबत स्पष्ट केले.