अधिवेशनात गाळेधारकांना दिलासा ; फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव !(व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने अधिवेशनात गाळेधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयाचा जळगाव महानगर गाळेधारक संघटनेतर्फे छत्रपती शाहू महाराज व्यापारी संकुलात फटाके फोडून व पेढ्यांचे वाटप करून जल्लोष करण्यात आला.

 

आज अधिवेशनात गाळे करार संदर्भात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेमध्य देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांच्या असलेल्या अडचणींवर आपले म्हणणे मांडले. त्यांनी महापालिका मालकीच्या भूखंडाच्या नुतनीकरण आणि हस्तांतरणासाठी लागणारे भूभाटक ८% केल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, याबाबत लक्षवेधी मांडली असता या निर्णयास शासनाने स्थगिती जाहीर केली आहे. याचे जळगाव महानगर गाळेधारक संघटनेतर्फे फटके फोडून स्वागत करण्यात आले. संघटनेतर्फे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील व माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, सुरेश आबा पाटील, राजेंद्र पाटील, युवराज वाघ, रिजवान जागीरदार, सुनिल गगडाणी, सुजित किंगे, रमेश सूर्यवंशी, भुषण देपुरा, ऋषी सोळुंके, आशिष सपकाळे, शिरीष थोरात सर्व पदाधिकारी व गाळेधारक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1174572163279041

 

Protected Content