अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार : अजित पवारांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

 

आज पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, माझे अनेक आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांशी चांगले संबंध आहेत. ते सांगतात की, आमचा उल्लेख करू नका, पण आम्हाला अधिकार असले, तरी मंत्रालयातून आलेल्या यादीतील अधिकार्‍यांचेच आदेश काढावेत, असे तोंडी आदेश आहेत. त्यातील काही तर अगदी परदेशातही गेले आहेत. बदल्या होणं, यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा असल्याचे पवार म्हणाले.

 

याप्रसंगी अजित पवार यांनी विविध पदांसाठीचे रेट कार्ड देखील जाहीर केले. ते म्हणाले, कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट तीन लाख रुपये आहे, असं प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलं आहे. लाखो-कोट्यावधी रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसं करू शकतील? शासन आपल्या दारी नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं तरी शासकीय अधिकार्‍यांची मानसिकता बदलल्याशिवाय उपयोग नाही. शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकार्‍यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नाही.

Protected Content