जळगाव (प्रतिनिधी) शासनाने १४ एप्रिल, २०२० पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (लॉकडाऊन) लागु करण्यात आली आहे. परंतू यामधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळून इतर सर्व कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याबाबतचे आदेश दिनांक १५ एप्रिलच्या रात्री १ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपनी व तत्सम आस्थापना दिनांक 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले होते. परंतू आता १५ एप्रिलच्या रात्री १ वाजेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
🔔फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB
🔔युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3