रावेर, प्रतिनिधी । अती पासवाने पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने विटवा येथील एका शेतक-याने तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे मयत सुभाष चौधरी यांच्या कुटुंबीयाल शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी केली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर तालुक्यातील विटवा येथील सुभाष विठ्ठल चौधरी वय ५७ या शेतक-याने त्यांच्या शेतात कपाशी व भाजी-पालाची लागवड केली होती यावर्षी सततच्या पावसाने या पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे मयत सुभाष चौधरी याने तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली याबाबत निंभोरा पोलीसात अकास्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.