जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामपंचायतच्या जागेत अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून महिला ग्रामसेवकाला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील ग्रामपंचायतच्या जागेत रवींद्र उर्फ बाळू हरी बऱ्हाटे रा. गाडेगाव ता. जामनेर याने अतिक्रमण करून वास्तव्याला आहे. महिला ग्रामसेवक सुकेशनी जगन्नाथ सोनवणे यांनी २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्यांनी रवींद्र बऱ्हाटे याला नोटीस जारी केली होती. याचा राग आल्याने रवींद्र उर्फ बाळू हरी बऱ्हाटे याने महिला ग्रामसेवकाला शिवीगाळ करून दमदाटी करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात गाडेगाव येथील महिला ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रवींद्र उर्फ बाळू हरी बऱ्हाटे रा. गाडेगाव ता. जामनेर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहे.