अडावद, ता. चोपडा प्रतिनिधी । चोपडा येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू असणारा रूग्ण या विषाणूवर मात करून आपल्या घरी परतला आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रकोप आढळून आला आहे. यात गावातील ५८ वर्षांचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने त्याच्यावर चोपडा येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने या रूग्णाला कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात येऊन शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. रूग्णालयाबाहेत त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकून वा टाळ्या वाजवत स्वागत करण्यात आले. दरम्यान, अडावाद येथे आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश तांदळे आणि त्यांच्या सहकार्यांनी या कोरोनामुक्त व्यक्तीचे स्वागत केले.