अडावद प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी येथील आरोग्य केंद्राच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णुप्रसाद दायमा, डॉ.अर्चना पाटिल यांनी शुक्रवार २२ मे रोजी अडावद गावात कोव्हिडं-१९ प्रतिबंधीत भागात रोग प्रतिकारशक्ती वाढणे कामी. प्रत्येक घरा मधील व्यक्तीना, घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत “आरसेनीक अल्बम ३०” या होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप करून औषधोपचार घेणे विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आरोग्य सहाय्यक पी.एस.लोखंडे, प्रकाश पारधी, आरोग्य सेवक विजय देशमुख, सुधीर चौधरी, महेंद्र पाटिल, जगतराव पाटिल, दिनेश वाघ,परिचर-धुडकू वारळे आदी परिश्रम घेत आहे. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश चौधरी, डॉ.विश्वास पाटिल, डॉ.राहुल पाटिल, डॉ.पंकज पाटिल आदी उपस्थित होते.