यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथील जिल्हा परिषद मूलांची शाळेचे छत हे पाऊसाच्या पाण्यामुळे गळत असल्याने या ठीकाणी ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्राम पंचायत पासुन तर लोकप्रतिनिधी सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, या विषयासंदर्भात रिपाईचे कार्यकर्ते अशोक तायडे यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत तक्रार दिली आहे.
शाळेच्या खराब परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी ना. हरीभाऊ जावळे यांना कल्पना दिली असता त्यांनी संबधीत विभागास सूचना देऊन देखील काही उपयोग झाला नाही. याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य नंदा दिलीप सपकाळे यांची भेट घेवुन सरपंच नितिन चौधरी व आदींना १४ व्या वित्तीय आराखड्यातून दुरूस्ती करण्याची मागणी केली होत. तरी देखील दुरुस्ती विषयाकडे काही लक्ष दिले गेले नसल्याने या इमारतीची छत गळत आहे. या शाळेतील विद्यार्थांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यासारखी परिस्थिती उदभवलेली आहे. रिपाई युवाचे जिल्हा कार्यध्यक्ष अशोक तायडे यांनी गावातील रिपाईचे कार्यकर्त व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन शाळेतील मुख्यध्यापक यांच्याशी शाळेत जाऊन शाळा इमारतीच्या छत गळतीबाबत सविस्तर चर्चा केले केली व तात्काळ या शाळेची दुरूस्ती न झाल्यास शाळेला कुलूप लावुन बंद करण्यात येईल अशा आशयाचा इशारा वजा तक्रार मुख्याध्यापक पवार यांना दिले. याप्रसंगी रिपाईचे कार्यकर्ते पवन सोनवणे , विशाल तायडे दिवाकर तायडे , पदमाकर तायडे, दिपक सोनवणे, कैलास लोहार, किरण माहाजन , संतोष तायडे, राजू लोहार, विजु चौधरी, संदिप कोळी, दिलीप कोळी, दिपक कोळी, संजय तायडे यांच्या सह सुमारे१०० ते १२५लोक यावेळी उपस्थित होते. या संदर्भात अट्रावल येथील सरपंच नितिन चौधरी यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क शाळा विषयी माहीती घेतली असता त्यांनी सांगीतले की, शाळेच्या समस्यांना घेवुन आम्ही जिल्हा परिषद शिक्षण विभागापासुन आमदार व जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधुन या संदर्भातील माहीती दिली असुन देखील काही एक उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगीतले. दोन महीन्यापुर्वी आम्ही जिल्हा परिषद सदस्य नंदा दिलीप सपकाळे यांची भेट घेवुन शाळेला पावसाळ्या होणाऱ्या अउचणींची माहिती दिली होती असे सरपंच यांनी सांगीतले.