जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध भागातून अडीच लाख किंमतीच्या चोरलेल्या ९ दुचाकीसह अट्टल गुन्हेगारास भुसावळ परीसरातून आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गणेश बाबुलाल राजपुत (जंगीपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, सहा.पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मानसिंग गिरासे , हवालदार सुनीत पंडीत दामोदरे, हवालदार जयंत भानुदास चौधरी, कॉन्स्टेबल विजय शामराव पाटील, सचिन प्रकाश महाजन, भगवान तुकाराम पाटील, महेश आत्माराम महाजन, नंदलाल दशरथ पाटील आदींनी आरोपीच्या शेंदूर्णी गावातून मुसक्या आवळल्या.
शेंदुर्णी गावातील नाक्याजवळ आरोपी चोरीच्या मोटारसायकलसह मिळून आला. आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ही दीपनगर सरगम गेट येथून डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात चोरली होती व त्याबाबत भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.