धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील पाणी भरण्यासाठी पायी जात असलेल्या वृध्दाला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पाळधी शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर घडली होती. या अपघात प्रकरणी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथे निंबा पूंजू धनगर (वय-६०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे पाळधी शिवारात शेत आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास निंबा धनगर हे शेतात पाणी भरण्यासाठी पायी मार्गाने राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत निंबा धनगर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखले केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले होते. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन धारक वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरण मयत निंबा धनगर यांच्या मुलगा प्रमोद निंबा धनगर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.