अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर महिला जखमी

धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील अमोल हॉटेलनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर सोबत असलेल्या महिला गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी १५ मार्च रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील दहिगाव येथील नामदेव किसन पाटील हे पत्नी शोभाबाई नामदेव पाटील यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ सीक्यू १५७७) ने १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता जळगावकडून धरणगावमार्गे पारोळा येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळील हॉटेल अमोलजवळ एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नामदेव पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या त्यांची पत्नी शोभाबाई नामदेव पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या संदर्भात मयताचा मुलगा हितेंद्र पाटील याने धरणगाव पोलीस ठाण्यात १० घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सय्यद करीत आहे.

Protected Content