अजूनही अमित शाहांच्या मनात शिवसेनेची भिती ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेचा समाचार घेतांना खासदार संजय राऊत यांनी शाहांना अजून देखील शिवसेनेची भिती वाटत असल्याची टिका केली.

 

काल नांदेड येथील सभेत अमित शाहा यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती. याला आज खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. आज पत्रकारांशी बोलतांना राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी २० मिनिटाचं भाषण केलं. त्यात ७ ते ८ मिनिटं ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर बोलले. ही आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेनेचं भय आहे. शिवसेनेची भीती कायम असणं चांगलं आहे. आम्ही आमचा संघर्ष करत आहोत. आम्ही आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी युतीत असताना वचन पाळलं नाही. धोका दिला अन् कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊ बसले, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. शाह यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. धोका कुणी दिला? का दिला? त्याचं उदाहरण हे आजचं सरकार आहे. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच बोलणी झाली नसल्याचं म्हणत होता. मग आता शिंदे गटाला कशाच्या आधारे मुख्यमंत्रीपद दिलं? गद्दार शिंदे गटाला मांडीवर घेऊन बसला. हा धोका नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Protected Content