अग्रवाल चौकात दोन दुचाकीची समोरासमोर धडक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अग्रवाल चौक असलेल्या जागी दोन वाहनांची समोरासमोर धडक होवुन एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील मुंदडा नगरातील रहिवासी रमेश पुंडलीक सेानार(वय-६७) त्यांच्या चाकी(एमएच.१९. डी.ए. ७३३८) ने रुबी हॉस्पीटल जवळून जात असतांना समोरुन सुसाट वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात रमेश सेानार जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content