पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानका जवळ निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या सुपर फास्ट एक्सप्रेस समोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून मयताची ओळख पटली. सुनिल मन्साराम सोनवणे (वय – २५) रा. वाघुलखेडा ता. पाचोरा असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानका जवळ निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या सुपर फास्ट एक्सप्रेस समोर आल्याने तरूणाचा मृत्यू झाला होता. सुरूवातील अनोळखी म्हणून पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांनी केले होते. दरम्यान सायंकाळी ही बातमी वाघुलखेडा येथे पोहचल्यावर येथील सुनिल मन्साराम सोनवणे (वय – २५) हा २९ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरुन पाचोरा येथे कपडे घेण्यासाठी जातो असे सांगुन निघाला होता. तो घरी न आल्याने कुटुंबियांनी सोशल मिडियावर आलेल्या बातमीचा सहारा घेत ग्रामीण रुग्णालय गाठले असता मयत हा सुनिल सोनवणे च असल्याचे निष्पन्न झाले. सुनिल सोनवणे हा मजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावायचा. मात्र तो रेल्वे स्थानकाकडे का गेला ? व त्यांने आत्महत्या केली असेल का ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मयत सुनिल सोनवणे याचे पाश्चात्य वृद्ध आई वडिल, दोन बहिणी असा परिवार असून सोनवणे परिवाराचा एकुलता एक मुलगा गमावल्याने परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.