अखेर अपघात जखमी हरणाचा दुर्दैवी अंत : वनविभागाने केले अंत्यसंस्कार

यावल,  प्रतिनिधी   । येथील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाटयाजवळ अज्ञात वाहनाने धडक देवुन झालेल्या अपघातात जखमी झालेल्या हरणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वन्यप्राणी प्रेमींमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षित व बेजबाबदारपणामुळे संप्तप प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान  ‘त्या’ मरण पावलेल्या हरणाचे वनविभागाच्या वतीने पंचनामा व शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आले.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल ते भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर रोडाच्या कडेला सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाच वर्ष वयाचे नर जातीचे  हरण हेजखमी  अवस्थे पडलेले असता भुसावळकडुन यावलकडे येणारे मिनिडोअर चालक प्रशांत बारी (रा. यावल) व त्यांच्या सोबत येत असलेले विक्की बाविस्कर यांना ते दिसुन आले.  यावेळी विक्की बाविस्कर याने तात्काळ वाहन थांबवुन त्या जखमी  अवस्थेत असलेल्या हरणास यावल येथे वनविभागाच्या कर्मचारी यांच्याकडे सोपवुन जखमी हरणाच्या उपचार करावा यासाठी प्रयत्न केले. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयावर लक्ष न देता एका ठिकाणी  कार्यक्रमास जात असल्याचे सांगुन त्या ठिकाणाहुन काढता पाय घेतला. वन विभागाच्या बेजबाबदार आणि  दुर्लक्षीतपणामुळे अखेर दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर उपचाराअभावी त्या हरणाचा दुदैवी मृत्यु झाला.  या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, आकास चोपडे, विक्की बाविस्कर, किशोर नन्नवरे यांनी वन विभागाच्या अशा प्रकारे हरणाच्या मृत्युला जबाबदार व गैरवागणुकी बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.   या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान घटनेचे वृत्त लाईव्ह ट्रेंड न्युजला झळकताच सहाय्यक वनसंरक्षक विशाल कुठे, वनपरिक्षेत्राचे विक्रम पदमोर यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी आंनदा पाटील यांच्यासह वनसंरक्षक ईब्राहीम तडवी, चेतन अढळकर, आकाश चोपडे , विक्की बाविस्कर आणि  किशोर नन्नवरे यांच्या उपस्थितीत मरण पावलेल्या हरणाच्या मृत्युचा पंचनामा करण्यात आला.  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ .आर. सी. भगुरे यांनी हरणाचे शवविच्छेदन करून वन विभागाच्या आवारात अंत्यविधी करण्यात आले.

 

Protected Content