चाळीसगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय धोबी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महाराष्ट्र सरपंच असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि दै.सर्वाच्या ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती अ.भा.धोबी महासंघाचे अध्यक्ष आणि मुंबईचे उद्योगपती कृष्णकुमार कनोजिया, अ.भा.धोबी महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार व मार्गदर्शक आणि नाशिकचे उद्योगपती राजेंद्र आहेर यांनी नाशिक येथे श्रीयुत राजेंद्र आहेर यांच्या “हॉटेल न्यु हॉलीडे परवाना” मध्ये आयोजित बैठकीत. २ ऑगस्ट २०२०ला केली आहे. अखिल भारतीय धोबी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल किसनराव जोर्वेकर यांचे राज्यभरातील धोबी (परीट) समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.