जळगाव, प्रतिनिधी | येथील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या पत्नी मृणालिनी चित्ते यांनी ब्युटी पेजेंट विआ मिस अँड मिसेस इंडिया स्पर्धेत मिसेस गोल्ड कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाचे औचित्य साधून अखिल भारतीय जिवा सेना संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा ब्युटी पेजेंट विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021 स्पर्धेचा अंतिम सोहळा जयपूर येथे नुकताच पार पडला. या स्पर्धेत नाशिक, पुणे, नागपूर, दिल्ली, बेंगलोर व यासह संपूर्ण भारतामधून अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या ३५ सहभागी स्पर्धकांमधून मृणालिनी चित्ते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यास्पर्धेत वेस्टर्न ट्रॅडिशनल इंडो वेस्टर्न स्पार्कल डिझायनर आऊटफिट थीमवर आधारित एकूण तीन राऊंड झाले. फॅशन सिक्वेन्स फायनलमधून टायटल क्राऊन करिता कॅटवॉक केले.यामधून पाच महिलांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूने म्हणून आयोजक.हरीश सोनी, मॅनेजमेंट हेड ममता गर्ग यांच्या हस्ते अवॉर्ड देण्यात आला. नॅशनल लेव्हलला प्रतिष्ठेचा मिसेस इंडिया 2021 अवॉर्ड मृणालिनी चित्ते यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय जिवा सेना या संघटनेकडून त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा अधक्ष देविदास फुलपगारे यांनी मृणालिनी चित्ते यांना भविष्यात मिस वर्ड हा अवॉर्ड मिळावा अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. परिवार सांभाळून त्या या उंचीवर पोहचल्या त्यात त्यांना त्यांचे पती डॉ. प्रकाश चित्ते यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ या जोरावरच या शिखरावर पोहचू शकले अशी त्यांनी भावना बोलून दाखवले. याप्रसंगी डॉ. प्रकाश चित्ते, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे, वरुळ ता .शिरपूर येथील धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ओमकार येशी , पाळधी येथील रिटायर्ड शिक्षक आत्माराम फुलपगार, सामाजिक कार्यकर्ते तात्या फुलपगारे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, जिल्हा संघटक प्रकाश आप्पा झुरके, शहर अध्यक्ष विशाल कुंवर आदी उपस्थित होते.