अखिल भारतीय जिवा सेना संघटनेची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी  । अखिल भारतीय जिवा सेना या नाभिक  संघटनेची जिल्हास्तरीय बैठकीचे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या मागील वर्षाचा आढावा घेत  विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.

 

अखिल भारतीय जिवा सेनेची जिल्हास्तरीय बैठकिस   प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले,जिल्हा अध्यक्ष देविदास  फुलपगारे , कर्मचारी संघटनेचे अनिल जगताप , जिल्हा कार्या अध्यक्ष अनिल चौधरी ,  जिल्हा सचिव प्रा. डॉ. नरेंद्र महाले,  जिल्हा समन्वय समिती प्रमुख किशोर श्रीखंडे, जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे , जिल्हा अध्यक्षा  कोकिळा चित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी  जिल्ह्यातील राहिलेली तालुक्यामधील कार्यकारणी निवड करणे, सामाजिक व शैक्षणिक नवनवीन उपक्रम राबवणे, ९  ऑक्टोबर रोजी जिवाजी महाले यांची जयंती जिल्ह्यात साजरी करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी  संघटनेच्या धोरणात्मक चर्चा केली. महिला संघटन वाढवणे, ग्रामीण भागात संघटनेचा प्रचार व प्रसार करणे याबाबत जिल्हा सचिव प्रा. डॉ. नरेंद्र महाले यांनी  मार्गदर्शन केले.  जिल्हा कार्याअध्यक्ष अनिल चौधरी यांनी संघटनेच्या नियमाबद्दल विचार मांडले. नाभिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप  यांनी जिल्ह्यात नाभिक कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी संपूर्ण जिल्हाभर जीवा सेनेचे कर्मचारी जोडो अभियान राबवू असे सांगितले. जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे यांनी जिल्ह्यात जिवा सेना तळागाळातल्या समाज बांधवापर्यंत पोहचविण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

बैठकीला अनिता आंबिकार , ज्योती बोरनारे, जिल्हा निरीक्षक किरण  नांद्रे ,जिल्हा समन्वय समिती प्रमुख किशोर  श्रीखंडे , पूर्व विभागीय अध्यक्ष उदय  सोनवणे, पश्चिम विभागीय जिल्हा उपाध्यक्ष राहुल  जगताप ,  पूर्व विभागीय जिल्हा उपाध्यक्ष अनिल  टोगे , उत्तर विभागीय जिल्हा उपाध्यक्ष गणेश  शेट्टी, उत्तर विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश जगताप, पूर्व विभागीय जिल्हा संपर्क प्रमुख सुनील  श्रीखंडे,  जिल्हा सह सचिव संजय सोनवणे, शहर कार्याअध्यक्ष विशाल कुवर,  शहर सचिव विजय कुवर, सह उपाध्यक्ष राहुल नेरपगारे , जिल्हा संघटक सुरेश ठाकरे ,  प्रकाश झुरखे , जगन्नाथ फुलपगार, दिलीप गायकवाड , तालुका अध्यक्ष जिवन बोरनारे ,मनोज सूर्यवंशी ,रवींद्र निकम. देविदास बाविस्कर ,भिका बानाईत , रवीद्र  पवार ,पितांबर निंबायत, रमेश निंबायत , कायदे विषयक सल्लागार ॲड राजू बोरणारे ,   भुसावळ कार्याअध्यक्ष विनोद आंबेकर  कैलास वारुळकर , चेतन वाघ ,  नितीन सनांसे , सुनिल डी श्रीखंडे ,देविदास ठाकरे , झुंजारराव ,गोपाल आर सोनवणे , रामकृष्ण सावळे ,गोपाल व्ही सोनवणे ,श्रीराम सनांसे ,दिवाकर सोनवणे ,गणेश फुलपगार , गोरख सिरसाठ , अमोल महाले ,विकास सिरसाठ ,गणेश खोंडे ,धनराज पगारे ,अनिल पगारे ,प्रताप फुलपगारे , अजय सैदाणे , तात्या फुलपगारे ,संदीप आठवले ,गजानन पंडित ,धनराज वाघ , विष्णू बानाइत ,मोहन सैदाणे., भूषण अंबिकार , काव्या केराळे , इ समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content