अंतुर्ली येथे कपाशीच्या झाडाला चक्क काकडी : व्हायरल बातमीचा शेतकऱ्याला मनस्ताप (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर ।  गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कपाशीच्या पिकावर चक्क काकडी लागल्याची बातमी संबंधित शेतकऱ्याच्या नावानिशी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जावुन हकिकत जाणुन घेतली असता सदरची व्हायरल झालेली बातमी ही फेक असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील शेतकरी नितीन दादाजी पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात कपाशी पिकाची लागवड केलेली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतातील कपाशी पिकाच्या झाडाला चक्क काकडी लागली असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. या व्हायरल झालेल्या चुकीच्या बातमीमुळे संबंधित शेतकऱ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तसेच गावातुन व परिसरातुन त्यांना याबाबत विचारणा होत असल्याने नितीन दादाजी पाटील व त्यांच्या परिवाराला मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशी भावना संबंधित शेतकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.  कपाशी पिकावर काकडी लागली असल्याची बातमी सपशेल चुकीची आहे. याबाबत मला व माझ्या परिवारास याबाबत विचारणा करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/573130360768368

 

Protected Content