अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा ; अनिकेत पाटील यांची मागणी

 

धरणगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करव्यात अशी मागणी युवासेनेतर्फे युवासेना विद्यापीठ धरणगाव तालुका प्रमुख अनिकेत पाटील यांनी कुलगुरू यांना निवेदद्वारे केली आहे.

युवासेनेने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनाचा आशय : कोरोनाचा राज्यात वाढता प्रादुर्भाव बघता अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत जो निर्णय घेण्यात आला तो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचा नाही. जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे वसतिगृहात वास्तव्यास असलेले विद्यार्थी वसतिगृह बंद असल्यामुळे घरी गेलेले आहेत. महाविद्यालयाच्या ठिकाणापासून विद्यार्थी गावावर आहेत व महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. वाहतूक सेवा ही बंद असल्यामुळे तिथून प्रवास करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही व तसे केल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन आपण करत आहात. त्या काळात पावसाळा सुरू होईल .कोरोनामुळे बहुतेक शिक्षण संस्थांच्या इमारती विलगिकरण कक्ष म्हणून देण्यात आलेल्या आहेत. २२ मार्चपासून लॉकडाऊन असल्याकारणाने अभ्यासाचे साहित्य सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाही. तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करून अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द कराव्यात ही विनंती करण्यात आली आहे.

Protected Content