जळगाव : प्रतिनिधी । आता कर्मचारी संघटनांचे आंदोलन १ ऑक्टोबररोजी स्थगित करण्यात आल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ प्रशाळा आणि विभागातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या नियमित व बँकलॉगसह विषयांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या लेखी परीक्षांचे आयोजन .१२ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.
शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी संघटनांनी २४ सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा सुरळित पार पाडणे शक्य नसल्याने १ ऑक्टोबरपासून सुरू होणा-्या विद्यापीठ प्रशाळाविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील सर्व लेखी परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या होत्या
या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे., याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आव्हान विद्यापीठाने केले आहे . .