भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील स्टेट बँक समोरील अंडा-आमलेट हातगाडी विक्रेत्याला पैशांच्या कारणावरून एकाने लोखंडी झरा डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील स्टेट बँक समोर गजानन भिकाजी पवार (वय-५७) रा.देना नगर, भुसावळ हे अंडा भुर्जीचे गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. १० डिसेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान वाल्मीक नगरातील राहणारा ईश्वर उर्फ नीलू प्यारेलाल आटवाल हा तिथे अंडा भुर्जी खाण्यासाठी आला. अंडा भुर्जी खाल्यानंतर त्याच्याकडे पैसे मागितले. याचा राग आला नाही त्याने लोखंडी झरा दुकानदार गजानन पवार याला डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ईश्वर प्यारेलाल आटवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निलेश चौधरी करीत आहे